अभिनेता कार्तिक आर्यन हा यंदाच्या सर्वात हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया २’ने तब्बल १८५.९२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. बॉलिवूडमधील बरेच चित्रपट फ्लॉप होत असताना कार्तिकच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. अलीकडेच, त्याच्या आगामी चित्रपट ‘फ्रेडी’च्या प्रमोशन दरम्यान कार्तिकने चित्रपटाच्या यशाबद्दल भाष्य केलं. तसेच २०२२ मध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांच्या वादावरही मत व्यक्त केलं.

हेही वाचा – ‘द काश्मीर फाइल्स’संदर्भातील वादानंतर नदाव लॅपिड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्याला व्हल्गर म्हणालो कारण…”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

“इतर कोणताही चित्रपट चालत नसताना ‘भूल भुलैया २’ ने जबरदस्त कमाई केली आणि सिनेमा हॉलमध्ये ‘हाऊसफुल’ बोर्ड परत आणले,” असं कार्तिक ‘कोइमोई’शी बोलताना म्हणाला. तसेच “बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होण्यापेक्षा चित्रपटगृहात चांगलं प्रदर्शन करणाऱ्या चित्रपटांवर व्हायला हवी. चार दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी झाल्यामुळे दक्षिणेकडील चित्रपट चांगली कामगिरी करत आहेत, असं म्हणता येणार नाही,” असं स्पष्ट मत त्याने व्यक्त केलं.

२०२२ मध्ये, सर्वाधिक कमाई करणाऱ्या दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर्समध्ये राजामौलींचा ‘आरआरआर’, यशचा ‘केजीएफ: चॅप्टर २’, ‘कांतारा’ आणि मणिरत्नमचा ‘पोन्नियन सेल्व्हन: 1’ यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘दृश्यम२’ आणि ‘भूल भुलैया २’ हे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले.

हेही वाचा –“तिला माझा एकही शब्द…” अभिषेक बच्चनने सांगितला ऐश्वर्या रायबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

कार्तिक म्हणाला, “हे सर्व चांगल्या चालणाऱ्या चित्रपटांबद्दल आहे. शेवटी तो एक भारतीय चित्रपट आहे, जो चालतो किंवा चालत नाही. ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैया २’ ने उत्कृष्ट कामगिरी केली. पण लोक फक्त चांगल्या चाललेल्या चार दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल जास्त बोलतात, जणू काही ही शर्यत सुरू आहे.”