अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. तो आपल्या चाहत्यांच्या तो कायम संपर्कात असतो. आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आत्ताही त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
कार्तिकने आपला एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोत त्याने रंगीत जॅकेट घातलेलं आहे. चेहऱ्यावर त्याने एक स्कार्फ बांधला आहे आणि तो त्याने थोडासा खाली ओढला आहे. या फोटोचं कॅप्शन त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “हे सार्वजनिक ठिकाणी करण्याचा प्रयत्न करु नका. #मास्क है जरुरी”
View this post on Instagram
त्याचा हा फोटो आणि कॅप्शन वाचून चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अनेकांनी त्याला कॅप्शनचा राजा म्हटलं आहे. तर एक युजर म्हणतो, “आम्ही प्रयत्न जरी केला तरी आम्ही तुझ्यासारखे दिसणार नाही. त्यामुळे आम्ही मास्क घातलेलंच बरं!” तर अनेकांनी फक्त तुझ्यावरच्या प्रेमापोटी असा प्रयत्न करणार नाही अशीही कमेंट केली आहे. तर अनेकांनी त्याला काळजीपोटी सांगितलं आहे की तूही बाहेर पडू नकोस.
कार्तिक यापूर्वीही आपल्या भन्नाट कॅप्शनमुळे चर्चेत आला होता. कार्तिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो फारच कंटाळलेला आणि आळसावलेला दिसत आहे. जणू तो झोपेतून नुकताच उठला आहे असं वाटत आहे. त्याने चेहऱ्यावर हात ठेवला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “उठू की लॉकडाऊन होणार आहे?” या कॅप्शनमध्ये त्याने जांभई देतानाचा इमोजीही पोस्ट केला आहे.
लवकरच त्याचा ‘भूलभूलैय्या २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अभिनेता अक्षय कुमारच्या ‘भूलभूलैय्या’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात कार्तिकसोबत अभिनेता राजपाल यादव आणि अभिनेत्री किआरा अडवाणीही दिसणार आहे.