अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील नातं खास होतं. एकेकाळी हे दोघेही फार छान मित्र होते. सलमानने मदत केल्यामुळेच कतरिनाला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाल्याचंही म्हटलं जातं. कतरिनाला तिच्या करियरच्या सुरुवातीला सलमान खानकडून चांगला पाठिंबा मिळाला. कतरिनाही सलमानचा फार आदर करायची. मात्र अचानक परिस्थिती बदलली आणि हे दोघे दुरावले. आज कतरिना अभिनेता विक्की कौशलबरोबर विवाहबंधनात अडकत असताना सलमान खान मात्र या विवाहसोहळ्यात सहभागी होणार नाहीय. असं असलं तरी सलमानच्या पालकांनी आपल्या लग्नाला उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा असं कतरिनाला वाटतं होतं. मात्र कतरिनाची ही इच्छा सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता फार कमीच आहे.

सलमानने आपल्या लग्नाला यावं अशी कतरिनाची इच्छा होती. इतकचं नाही तर सलमानच्या पालकांनाही लग्नाला येऊन आशीर्वाद द्यावा असं कतरिनाला वाटत होतं. मात्र सलमानचे पालक प्रकृतीसंदर्भातील अडचणींमुळे लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. त्याचप्रमाणे सलमान द-बँग या टूरसाठी सौदी अरेबियाला गेला असल्याने लग्नाला उपस्थित नसणार.

काही काळापूर्वी सलमानची बहिणी अर्पिता हिला सुद्धा तुम्ही कतरिना-विक्कीच्या लग्नामध्ये सहभागी होणार की नाही असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेला. त्यावर उत्तर देताना अर्पिताने, आम्हाला आमंत्रणच मिळालेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. बॉलिवूडमधील मोजके चेहरे या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये करण जौहर, फराह खान, नेहा धूपिया, अंगद बेदी, कबीर खान, सनी कौशल आणि शर्वरी वाघ यासारख्या नावांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९ डिसेंबर रोजी कतरिना आणि विक्की लग्नबंधनात अडकणार आहेत. ७ आणि ८ डिसेंबरला लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांची रेचलेच असणार आहे. यामध्ये मेहंदी, संगीत यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. राजस्थानमधील सवाई माधोपुरमधील बरवाडा येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. १० तारखेला मोठं रिसेप्शन ठेवण्यात येणार असून त्यामध्ये अनेक कलाकार उपस्थिती लावतील असं सांगितलं जात आहे.