छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या या  शोची प्रतीक्षा प्रत्येक जण करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शोचे प्रोमो टीव्हीवर दाखवण्यात येत आहेत. सोशल मीडियावर देखील याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळॆ आता हा शो कधी सुरू होणार, याची उत्कंठा सगळ्या चाहत्यांना आहे. अखेर हा शो ऑगस्टच्या महिन्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ प्रश्न उत्तरांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. हा शो बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मन जिंकत आला आहे. केबीसीचे एकूण ३ प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. त्या प्रत्येक प्रोमोद्वारे ते वेगवेगळा संदेश देताना दिसत आहेत. तसंच नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये देखील एक खास व्यक्ती त्याच्या गावात शाळा बनवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केबीसीमध्ये सहभाग घेतो. तो केबीसीमध्ये पैसे जिंकून, त्याला त्या पैशाने गावात शाळा सुरू करायची आहे. सोनी वहिनीने हा शो प्रदर्शित होण्याबाबतची माहिती एका ट्विटद्वारे दिली आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी या शोची तारीख देखील जाहीर केली आहे. शोचा प्रोमो शेअर करत त्यांनी लिहिले की, “पहिल्या आणि दुसऱ्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाला, म्हणून या सीरिजचा तिसरा आणि शेवटचा भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बघायला विसरू नका केबीसी २३ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता.”

हा प्रोमो बघितल्यावर  प्रेक्षक आता २३ ऑगस्टची वाट बघताना दिसत आहेत. या शोचं सूत्रसंचालन नेहमी प्रमाणे अभिनेता अमितभ बच्चन करताना दिसतील. अमिताभ यांनी करोना काळातही केबीसीचं शूटिंग केलं होतं. बिग बी यांचे इतर बऱ्याच प्रोजेक्टवर काम सुरू आहे. ते अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसतील. तसंच ते इमरान हाश्मी सोबत  ‘चेहरे’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.