‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. शोमध्ये शानदार शुक्रवार असा एक शुक्रवारचा एपिसोड असतो. त्या दिवशी सेलिब्रिटी हजेरी लावतात. तर यावेळी अभिनेत्री नीना गुप्ता आणि गजराव राव हजेरी लावणार आहेत. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी अमिताभ यांनी खुलासा केला की ते पत्नी जया बच्चनशी रोज खोटं बोलतात.

हा व्हिडीओ सोनी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नीना गुप्ता बोलतात की “त्यांना अमिताभ यांना काही प्रश्न विचारायचे आहे. या प्रश्नांची तुम्ही खरं खरं उत्तर द्याल.” यावर अमिताभ म्हणतात की ‘ही तर माझी परिक्षा झाली.’ मग नीना प्रश्न विचारतात, “तुमची आता पर्यंत सगळ्यात आव्हानात्मक ठरलेली अशी भूमिका कोणती.” यावर अमिताभ म्हणतात, “प्रत्येक चित्रपट हा माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.”

आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट

आणखी वाचा : कधी मारहाण, तर कधी शिवीगाळ ; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे नीना पुढचा प्रश्न विचारतात, “जर तुम्हाला कोणत्या चित्रपटाला नकार द्यायचा असेल तर तुम्ही काय कारण देतात?” यावर मस्करी करत अमिताभ म्हणाले, “आधी चित्रपट तर मिळू द्या.” पुढे नीना म्हणाल्या, “कोणत्या गोष्टीपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरशी कधी खोटं बोलला आहात का?” यावर गजराज यांच्याकडे खून करत अमिताभ म्हणाले ‘पहिले त्यांना सांगू दया,” हे ऐकल्यावर प्रेक्षक हसू लागतात. त्यानंतर अमिताभ म्हणाले, “माझं असं आहे की मला दररोज खोटं बोलावं लागतं.” हे ऐकल्यानंतर सगळे हसू लागतात.