छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही रिअ‍ॅलिटीशोच्या १३ व्या पर्वात गुरुवारी एक स्पर्धक एक कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहचला. मात्र पर्वामधील दुसरा कोट्याधीश होण्याचा त्याचा मान थोडक्यात हुकला. बुधवारी दोन हाजारांपर्यंत मजल मारणाऱ्या मध्य प्रदेशमधील प्रांशु त्रिपाठी या तरुणाने एक कोटीच्या प्रश्नापर्यंत अगदी उत्तम उत्तर दिली. मात्र एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. २० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत दोन लाइफ लाइन वापरणाऱ्या प्रांशूने नंतर थेट ५० लाखांच्या प्रश्ना आपल्या उरलेल्या दोन लाइफलाइन वापरल्या.

मध्य प्रदेशमधील उमरीया येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक असणारा प्रांशु हा गणिताचा शिक्षक आहे. तो नववी आणि दहावीच्या मुलांना गणित हा विषय शिकवतो. प्रांशुने २० हजार रुपये जिंकल्यानंतर ५० लाखांच्या प्रश्नापर्यंत ज्या पद्धतीने तर्कबुद्धी वापरुन उत्तरं दिली ते पाहून प्रेक्षकांबरोबरच होस्ट अमिताभ बच्चनही थक्क झाल्याचं पहायचला मिळालं. मी पेशाने शिक्षक असलो तरी मनाने क्रिकेटपटू आहे असं सांगणारा प्रांशु भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आपला गुरु मानतो.  प्रांशु रोहितला एवढा मनतो की त्याच्या पाकिटामध्ये रोहितचा फोटो आहे. रोहितला त्याने अगदी देवाची उपमाही दिल्याचं पाहयला मिळालं. रोहित सोबत त्याचा संवाद घडवून आणल्याने तो भावूक झाल्याचंही पहायला मिळालं. रोहितने त्याला भेट म्हणून खास ऑटोग्राफ केलेले ग्लोव्हज भेट दिले.

नक्की वाचा >> KBC 13: सात कोटींसाठी विचारण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘हा’ प्रश्न; देता आलं नाही उत्तर

५० लाखांचा प्रश्न काय होता?

खेळाबद्दल बोलायचं झालं तर २५ लाख रुपये जिंकल्यानंतरही प्रांशुकडे २ लाइफलाइन बाकी होत्या. ५० लाखांसाठी त्याला एक ट्रीक क्वेशन विचारण्यात आला. जमीनीवर किंवा पाण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास पृथ्वीवरील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती? असा प्रश्न ५० लाखांसाठी विचारण्यात आलेला. यासाठी हिमालय, मध्य समुद्रातील पर्वरांग (मीड ओशन रीज), अँडीज आणि ट्रान्सआर्टीक माऊंटन असे चार पर्याय देण्यात आलेले. हिमालय आणि अँडीज हे उत्तर नसल्याचं प्रांशुला ठाऊक असल्याने त्याने ५०-५० पर्याय निवडला. मात्र त्यात हे दोन पर्यायच गेल्याने प्रांशुचा गोंधळ आणखीन वाढला. अखेर त्याने एक्सपर्टची मदत घेत उत्तर दिलं आणि ५० लाख जिंकले. या प्रश्नाचं उत्तर मध्य समुद्रातील पर्वरांग (मीड ओशन रीज) असं होतं.

नक्की वाचा >> Video: KBC मधील व्हिडीओ कॉलवर रोहित शर्माचा चाहता असं काही म्हणाला की रोहितनेच जोडले हात

एक कोटींच्या प्रश्नाला काय झालं?

एक कोटींसाठी दुसऱ्यांदा या पर्वात प्रश्न विचारण्यात आला. प्रांशुकडे कोणतीही लाइफलाइन नसताना त्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार होतं. मात्र या प्रश्नाचं उत्तर येत नसल्याने प्रांशुने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. महिन्याला ५१०० ते ५२०० रुपये मानधन म्हणून कमावणाऱ्या प्रांशुने उत्तर चुकतो तर थेट ४६ लाख ८० हजारांचा फटका बसेल असं सांगत मी संतुष्ट असून गेम क्विट करेन असं अमिताभ यांना सांगत ५० लाख रुपये स्वीकारत हॉटसीट सोडली.

प्रश्न काय होता?

गंज-ए-सवाई हे शाही जहाज ही कोणत्या भारतीय शासकाची संपत्ती होती ज्यावर ब्रिटिश समुद्री डाकू असणाऱ्या हेनरी एब्रीने हल्ला करुन लूट केली होती? असा प्रस्न एक कोटींसाठी विचारण्यात आला होता. यासाठी टीपू सुल्तान, हैदर अली, औरंगजेब आणि बाजीराव तिसरे असे चार पर्याय देण्यात आलेले. या प्रश्नाचं उत्तर प्रांशुला आलं नाही. आपण चारही लोकांबद्दल वाचलं असलं तरी एवढ्या सविस्तरपणे वाचलेलं नाही असं प्रांशु म्हणाला. अखेर त्याने गेम सोडल्यानंतर एक पर्याय निवडायचा म्हणून टीपू सुल्तान पर्याय निवडला. मात्र ते चुकीचं उत्तर निघालं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर औरंगजेब असं होतं.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त