‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अनेक स्पर्धक खेळ खेळत असतानाच बिग बींसोबत धमाल करताना दिसतात. अनेकदा बिग बी स्पर्धकांसोबत अनुभव शेअर करत असतात तर स्पर्धकही चांगले वाईट किस्से शेअर करतात. या शोचा नुकताच एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक बिग बींसोबत धमाल करताना दिसतोय.
या शोमध्ये आदित्य नावाचा स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे. आदित्यने एकेकाळी तो अनेकदा सिनेमा पाहत असल्याचं सांगितलं. एवढचं नव्हे तर काही सिनेमा तर चक्क १० वेळा पाहिले असल्याचं तो म्हणाला. या सिनेमांचे डायलॉगदेखील पाठ असल्याचं म्हणत आदित्यने नाना पाटेकरच्या एका लोकप्रिय डायलॉगला एका वेगळ्या ढंगात सादर केलं. आदित्यचं हे टॅलेण्ट पाहून बिग बी देखील थक्क झाले.
बिग बींनी आदित्यला डायलॉग म्हणण्यास सांगितलं यावर त्याने जर नाना पाटेकर हॉट सीटवर असते तर ते काय म्हणाले असते असं म्हणत डायलॉग बोलण्यास सुरुवात केली. नाना पाटेकर यांचा ‘एक मच्छर’ हा लोकप्रिय डायलॉग हटके अंदाजात आणि स्वत:च्या शब्दात बोलण्यास सुरुवात केली. “एक मुश्कील सवाल. एक मुश्कील सवाल, सारे लाइफलाइन खतम कर देता है. पेहेले एसएमएस करो…फिर ऑफलाइन ऑडिशन, फिर ऑनलाइन ऑडिशन, और फिर यहाँ हॉट सीट पर बैठ जाओ.इतनी मुश्किल से एक इंसान आता है, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट कर के, और एक मुश्किल सवाल पे आके अटक जाता है.” असं म्हणत त्याने कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर स्पर्धकांची कशी अवस्था होते हे वर्णन केलंय.
नाना पाटेकरच्या ‘यशवंत’ सिनेमातील ‘एक मच्छर’ हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला होता.