छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. सध्या कौन बनेगा करोडपतीचे १३ पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. तर शोमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे खेळ सोडला. त्या स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर देऊ शकता का?

काल प्रदर्शित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या एपिसोडमध्ये छत्तीसगडच्या पंकज कुमार सिंगने हजेरी लावली होती. पंकज यांना २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते आणि त्यांच्याकडे कोणती लाइफ लाइन देखील नव्हती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता त्यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न देता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि १२ लाख ५० हजार रुपये जिंकले .

आणखी वाचा : दिया मिर्झाने मुलाचा पहिला फोटो केला शेअर, कमेंट करत प्रियांका म्हणाली

अठराव्या शतकात शुजा-उद-दौलाने छोटा कलकत्ता किल्ला कोणत्या जिल्ह्यात बांधला?

A अमेठी B अयोध्या C मुर्शिदाबाद D वाराणसी

या प्रश्नाचे अचुक उत्तर B अयोध्या आहे. पण पंकज यांना योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच १२व्या प्रश्नापर्यंत त्यांच्याकडील सर्व लाइफनलाइन देखील संपल्या होत्या.

आणखी वाचा : जाहिरातीच्या लूकसाठी शाहरुखवर तब्बल ३३ लाख रुपये खर्च!

एवढंच नाही तर या आठवड्यात अमिताभ शोमध्ये लोकांच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड्सला ‘आशा अभिलाषा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यामध्ये अमिताभ स्पर्धक, स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. काल प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की जेवढे लोक स्टुडिओमध्ये आले होते, त्या सर्वांची इच्छा लिहिलेल्या चिट्ढ्या या अमिताभ यांच्या समोर एका वाडग्यात ठेवण्यात आल्या होत्या. यातून अमिताभ एका प्रेक्षकाच्या नावाची चिट्ढी उचलतात आणि त्याची इच्छा पूर्ण करतात. त्यांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार अग्निपथ कविता ऐकवली. यावेळी अमिताभ यांनी हॉटसीटवर असलेल्या पंकज यांची देखील एक इच्छा पूर्ण केली. पंकज कुमार यांना त्यांची आवडती अभिनेत्री जिनेलिया देशमुखची बोलण्याची संधी मिळाली.