देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, औषधं, बेड, व्हेंटिलेटर यांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे सध्या व्यवस्थेवर, प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. दिग्दर्शक केदार शिंदेनेही आता प्रशासनावर टीका केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून पोस्ट करत त्याने सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. या स्टोरीमध्ये तो म्हणतो, भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..

केदारने सोबत ऑक्सिजन सिलेंडरचा फोटोही पोस्ट केला आहे. सध्या देशात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना प्राणही गमवावे लागले आहेत. देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत असल्याने आता प्रशासन टीकेचा विषय बनलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक कलाकारांनी शासनव्यवस्थेवर टीका केली आहे. अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेता वीर दास ही त्यापैकीच काही नावं.