वादग्रस्त विधानं आणि कृतींनी सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणारी अभिनेत्री केतकी चितळे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री न्यू इअर सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तरीही केतकी शांत बसलेली नाही. तिच्यावर टीका करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तर देताना दिसतेय.

केतकीने ३१ डिसेंबरच्या रात्री तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती दारू पिताना दिसत होती. व्हिडीओ पोस्ट करताना तिने लिहिलं, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।” तिचा हा अंदाज पाहून नेटकरी चांगलेच संतापले आणि अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिच्यावर टीका केली.

आणखी वाचा : केतकी चितळेला राग अनावर! ट्रोलरला शिवी देत म्हणाली, “तुमच्या पिढीला…”

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने लिहिलं, “आमचं नवं वर्ष फक्त गुडी पाडवा. हिंदू धर्म खतरे में है।” त्याची ही कमेंट वाचून केतकी संतापली आणि तिने त्याला उत्तर दिलं आहे. या कमेंटला रिप्लाय देत तिने लिहिलं, “तुमचं जन्म कधीचा?” त्यावर तो नेटकरी म्हणाला, “का? माझ्या जन्मदिवसाला येण्याचा बेत दिसतो तुमचा.” त्याला रिप्लाय देत केतकी म्हणाली, “तुम्ही बायोडाटामध्ये २०१६ पासून सर्विस इंजिनिअर व रिलायन्स डिजिटलमध्ये २०१४ ते २०१५ काम केले आहे, असे लिहिले आहे. ही वर्ष रचना तर ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे आहे. ही पंचांगाप्रमाणे नाही. आता २६ जानेवारीला आपण गणतंत्र दिवस साजरा करणार, ते ही ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणेच आहे. असो, हे मात्र खरे आहे की तुमचा जो कुठला धर्म आहे तो प्रचंड कमकुवत असल्यामुळे, तुमच्या धर्माला माझ्या सनातन धर्मचा खतरा नक्कीच आहे.”

हेही वाचा : अभिनेत्री केतकी चितळेचे फेसबुकवर पुनरागमन, पोस्टने पुन्हा वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

केतकी चितळेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. एकीकडे या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केलं, तर दुसरीकडे काहींनी तिला तिच्या बिनधास्तपणाचं आणि स्पष्टवक्तेपणाचं कौतुक करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.