दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे ‘केजीएफ’ आणि ‘केजीए चॅप्टर २’ दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. या चित्रपटांना केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरातून भरभरून प्रेम मिळालं. दाक्षिणात्य स्टार असलेल्या यशचा हिंदी चित्रपटसृष्टीतही बराच मोठा चाहतावर्ग आहे. आज बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट मागच्या काळापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहेत. अशात आता दाक्षिणात्य स्टार यशने दाक्षिणात्य आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यशने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवली जायची, उत्तरेकडचे लोक आमच्यावर हसायचे. पण बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्र पलटलं.” असं या मुलाखतीत यशने म्हटलं आहे. आता हिंदी चॅनेल्सवर तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपट दाखवले जातात. एवढंच नाही तर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले जातात. मात्र त्यांना मूळ चित्रपटाएवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या सगळ्या गोष्टींवर यशने ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये भाष्य केलं.

आणखी वाचा- ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टीला बॉलिवूड चित्रपटांची ऑफर, मात्र हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास अभिनेत्याचा नकार, कारण…

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना यश म्हणाला, “१० वर्षांपासून आमचे डब केलेले चित्रपट उत्तर भारतात खूप लोकप्रिय ठरत आहेत. पण तेव्हा ते वेगळ्याच पद्धतीने दाखवले जायचे. लोक दाक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवायचे. काय ही अॅक्शन आहे, सगळे उडतायत वैगरे म्हणून लोक आमच्यावर हसायचे. असं सर्व सुरू झालं पण नंतर हळूहळू लोक याच्याशी जोडले जाऊ लागले. आज लोकांना आमचा आर्ट फॉर्म समजतोय. समस्या ही होती की आमचे चित्रपट कमी किंमतीत विकले जायचे. लोक वाईट पद्धतीने ते डब करायचे. त्यामुळे ते लोकांना दिसताना वेगळ्याच पद्धतीने दिसायचे.”

आणखी वाचा- ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकांनी एकत्र येत प्रेक्षकांना दिली खास भेट, ट्वीट करत म्हणाले…

यश पुढे म्हणाला, “आता लोक दाक्षिणात्य चित्रपटांना समजू लागले आहेत. याचं सर्व श्रेय एस एस राजामौली यांना जातं. त्यांच्यामुळेच हा एवढा मोठा बदल घडून आला आहे. आता लोक आमच्या चित्रपटांशी जोडले जात आहेत. जर तुम्हाला डोंगर फोडायचा असेल तर त्यासाठी सातत्याने काम करावं लागेल. ‘बाहुबली’ने ते काम इथे केलं. ‘केजीएफ’ एक विशिष्ट हेतू समोर ठेवून बनवण्यात आला होता. लोकांना प्रेरणा देण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता. आता लोकांनी दाक्षिणात्य चित्रपटांना नोटीस करायला सुरुवात केली आहे.”

आणखी वाचा-‘केजीएफ’ स्टार यशने सतत सांगूनही विजय देवरकोंडाने ‘तो’ निर्णय घेतला अन्…; आता पुन्हा करतोय मोठी चूक

दरम्यान यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने जगभरात १२०७ कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. या यादीत एस एस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपटही आहे. तसेच २०२२मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई केलेल्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत केवळ ४ बॉलिवूड तर इतर सर्व दाक्षिणात्य चित्रपट आहेत. यशच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं तर त्याने अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही मात्र तो ‘केजीएफ चॅप्टर ३’ दिसणार असल्याचं बोललं जातंय. अर्थात यावर त्याने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kgf star yash open on making fun of south film by north indians mrj
First published on: 06-11-2022 at 09:40 IST