आपल्या हजरजबाबी आणि अफलातून कॉमेडीने लोकांना पोट धरून हसायला लावणारी कॉमेडियन भारती सिंग सध्या ‘खतरों के खिलाडी१०’ मध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीसह तिचा पती हर्ष लिंबाचियादेखील या शोमध्ये सहभागी झाला आहे. गेल्या वर्ष भारती आणि हर्षने प्रेमविवाह केला. त्यावेळी त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या या जोडीतलं प्रेम खतरों के खिलाडीमध्येही पाहायला मिळत आहे. मात्र या शोमधील एका महिला स्पर्धकाची आणि हर्षची जवळीक पाहता भारती असुरक्षित झाली असून तिने या स्पर्धकाला सक्त ताकीद दिल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘खतरों के खिलाडी १०’ मधील एका भागाचा प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक कठीणातील कठीण टास्क करताना दिसत आहेत.तर दुसरीकडे भारती तिच्या विनोदाने सगळ्यांचं टेन्शन हलकं करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यामध्ये शोमधील स्पर्धक करिश्मा तन्ना मुद्दाम हर्षसोबत फ्लर्ट करण्याचं नाटकं करते. हर्ष आणि करिश्मा यांची मस्ती बघून भारतीनेदेखील मस्करीमध्ये करिश्माला ‘माझ्या नवऱ्यापासून दूर रहा’, अशी ताकीद दिल्याचं पाहायला मिळालं.

या प्रोमो व्हिडीओ करिश्मा, हर्षच्या खांद्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून भारतीने मस्तीच्या अंदाजात माझ्या नवऱ्यापासून दूर रहा असं म्हटलं. त्यानंतर करिश्मानेदेखील लगेच भारतीला घाबरण्याची अॅक्टींग करत, ‘हर्ष माझा भाऊ आहे’, असं म्हटलं. त्यानंतर या स्पर्धकांमध्ये एकच हाशा पिकला.

पाहा : नुशरतची भन्नाट फॅशन; चाहते झाले फिदा

 दरम्यान, छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो म्हणून ‘खतरों के खिलाडी’कडे पाहिलं जातं. यंदाच या शोचं १० पर्व आहे.या पर्वामध्ये हर्ष,भारती,करिश्मा,धर्मेश सर यांच्या व्यतिरिक्त मराठमोठी अभिनेत्री अमृता खानविलकरही सहभागी झाली आहे.