Kiara Advani clean diet for War 2 revealed : कियारा अडवाणी सध्या चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे आणि तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिचा ‘वॉर २’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

‘वॉर २’ मध्ये कियाराचा बिकिनी लूकही पाहायला मिळणार आहे आणि ती जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. ‘वॉर २’ च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना कियाराच्या जबरदस्त अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळाली आहे. ‘वॉर २’साठी कियाराने तिच्या शरीरावर खूप मेहनत घेतली आहे. ती डाएट प्लॅन फॉलो करत होती.

न्यूट्रिशनिस्ट निकोल लिनहारेस केडिया यांनी पिंकव्हिलाशी केलेल्या संभाषणात कियारा अडवाणीच्या डाएटबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की ‘कियाराला घरगुती अन्न आवडते. तिच्या आहारात सर्वात जास्त वाढलेली गोष्ट म्हणजे प्रथिनांचे सेवन. आमचे ध्येय तिचे शरीर टोन करणे आणि लीन मसल्स करणे हे होते. तसेच शरीरातील चरबी कमी करणे हे होते, ज्यामुळे सर्व काही मोजमापाने खावे लागले होते.’

‘अशी’ करायची ती तिच्या दिवसाची सुरुवात

कियाराचे वेळापत्रक ट्रेनिंग आणि तासनतास शूटिंगने भरलेले होते, पण तरीही ती नाश्ता करायची. तिचा दिवस प्रोटीन पॅनकेक्सने सुरू व्हायचा. हे पॅनकेक्स ओट्सचे पीठ, अक्रोडचे पीठ आणि प्रोटीन पावडरने बनवले जात होते. ते गोड करण्यासाठी ती ताज्या बेरी किंवा घरगुती हेझलनट बटरचा वापर करायची. उच्च-प्रथिने, फायबर-समृद्ध नाश्त्याने तिला दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जा दिली.

कियाराचे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण चव आणि पोषक तत्वांनी भरलेले होते. ती बहुतेकदा ग्रील्ड चिकन, चिकन करी, लहान बटाटे, एवोकॅडो आणि इतर अनेक पदार्थ लंच आणि डिनरमध्ये खात असे. तिने तिचे जेवण हलके ठेवले, पण त्यात प्रथिने जास्त होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री तिच्या वर्कआउटनंतर प्रोटीन शेक नाही तर देसी सत्तू ताक पित असे. हे पेय केवळ शरीराला थंड ठेवत नाही तर हायड्रेशन आणि स्नायू पुनर्प्राप्तीमध्येदेखील मदत करते.

१४ ऑगस्ट रोजी ‘वॉर २’ होणार प्रदर्शित

‘वॉर २’मध्ये कियारा केवळ रोमँटिक भूमिकेत नाही तर तिचे पात्र आता अ‍ॅक्शनने भरलेले आहे. ट्रेलरमध्ये ती अद्भुत स्टंट करताना दिसते. या चित्रपटात तिच्याबरोबर ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशनदेखील दिसतील. १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट यशराज स्पाय युनिव्हर्समधील पुढील चित्रपट आहे.