Kiku Sharda On The Great Indian Kapil Show : किकू शारदाबद्दल बऱ्याच काळापासून असे वृत्त येत आहे की, त्याने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सोडला आहे. असेही म्हटले जात होते की, कृष्णा अभिषेकबरोबर झालेल्या भांडणानंतर त्याने हा शो सोडला. कारण- सेटवरून दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही भांडताना दिसत होते. आता किकू शारदाने या अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
किकूने कृष्णाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही चार्ली चॅप्लिनच्या लूकमध्ये दिसत आहेत आणि दोघेही एकमेकांच्या ओठांवर बोट ठेवून गप्प राहण्याचे संकेत देत आहेत. फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “हे बंधन… कधीही तुटणार नाही. ते भांडण एक प्रॅन्क होता.”
किकूने पुढे लिहिले की, मी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सोडल्याच्या या बातमीकडे लक्ष देऊ नका. मी नेहमीच शो आणि कुटुंबाचा भाग असेन. हे सर्व सोडून नेटफ्लिक्सवर शो पाहण्यासाठी जा. फक्त ३ भाग शिल्लक आहेत.
किकूची ही पोस्ट वाचून चाहतेही खूप आनंदी झाले आहेत. एकाने लिहिले की, तुम्ही सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. एकाने लिहिले की, अरे साहेब, हे ऐकून बरे वाटले, तुम्ही शोचे सर्वांत जुने कलाकार आहात. एकाने लिहिले की, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की, हा एक प्रॅन्क असेल.
किकू आता ‘राईज अँड फॉल’ या एका नवीन शोमध्येही दिसणार आहे. हा शो अशनीर ग्रोव्हर होस्ट करीत आहेत. किकूव्यतिरिक्त धनश्री वर्मासह इतर अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये दिसणार आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये किकू आणि कृष्णा भांडताना दिसले होते
व्हिडीओमध्ये किकू शारदा म्हणत होता, “मी टाईमपास करीत आहे का?” यावर कृष्णा अभिषेक रागावला आणि म्हणाला, “ठीक आहे. तू ते कर. मला काहीच हरकत नाही. मी इथून निघून जाईन. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझा आवाज उठवू इच्छित नाही.” त्यावर किकूने त्याला सांगितले की, तो हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने घेत आहे. अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडीओला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हटले असले तरी काहींनी असेही म्हटले होते की, दोघांमध्ये खरोखरच भांडण झाले होते.