नेटफ्लिक्सवर सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ ट्रेंडिंगमध्ये आहे. त्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर व किकू शारदा कॉमेडी करताना दिसत आहेत; तर कपिल शर्मा शो होस्ट करतोय. पुन्हा एकदा हा शो भांडणामुळे चर्चेत आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्यात वाद होत आहेत. या गोंधळाचे कारण कळलेले नाही; परंतु त्यांच्यात ज्या पद्धतीने वाद होत आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्या भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जिथे ते दोघेही शोसाठी रिहर्सल करताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर शोचे इतर टीम मेंबर्सदेखील आहेत, जे एपिसोडची तयारी करीत आहेत.

कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्यात भांडण

व्हिडीओमध्ये कृष्णा अभिषेक इतका रागावतो की, तो त्याला सेटवरून निघून जाण्यास सांगतो. किकू त्याला सतत काहीतरी बोलतानाही दिसत आहे. दोघांमध्ये कशावरून वाद झाला हे स्पष्ट झालेले नाही. व्हायरल व्हिडीओ पाहता, असे दिसतेय की, कृष्णा आणि किकू शारदा यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. व्हिडीओच्या सुरुवातीला किकू शारदा असे म्हणताना ऐकू येतो की, मी फक्त टाइमपास करीत आहे? कृष्णा म्हणतो, मग ठीक आहे तू ते कर. कृष्णा हात जोडून म्हणतो की, भाऊ मला काही हरकत नाही, तू ते कर. मी जात आहे. किकू शारदा म्हणतो की, असं नाहीये, जर मला बोलावले आहे, तर मी माझे काम पूर्ण करेन ना. कृष्णा म्हणतो की, भाऊ, आय लव्ह यू आणि मी तुझा आदर करतो. मला माझा आवाज उठवायचा नाही. त्यावर किकू शारदा म्हणतो की, चुकीच्या व्यक्तीशी वेगळ्या पद्धतीने वागण्यात आले.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. काहींना वाटते की, हा प्रॅन्क आहे. या क्लिपवर कपिल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कपिलच्या शोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुनील प्रभाकर यांनी अभिनय केला आहे. यावेळी अर्चना पूरण सिंग यांच्याबरोबर नवज्योत सिंग सिद्धूदेखील परतले आहेत.

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ दर शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रसारित होतो. गेल्या भागात शेखर-विशाल, शान व नीती मोहन हे गायक आले होते. सुनील ग्रोव्हर गुलजार यांचा ड्युप्लिकेट म्हणून आला होता; तर किकू शारदा व बप्पी लाहिरी म्हणून आला होता.