Kiku Sharda Take Break From Kapil Show : गेल्या काही काळापासून कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर येत आहे. किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कपिलच्या या कॉमेडी शोबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. किकू शारदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून ब्रेक घेणार आहे. तो पुढील काही दिवस कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार नाही. यामागील कारण जाणून घ्या.

खरंतर, किकू शारदा ‘राईज अँड फॉल’ या नवीन रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. या शोचे शूटिंग बुधवारपासून सुरू होणार आहे. ‘राईज अँड फॉल’शी संबंधित एका सूत्राने आयएएनएसला सांगितले की, किकू शारदा या शोमध्ये दिसणार आहेत, त्यामुळे तो काही दिवस ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसणार नाही. जोपर्यंत तो नवीन शोच्या घरात आहे, तोपर्यंत तो जुन्या शोमध्ये दिसणार नाही.

या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणार किकू शारदा

‘राईज अँड फॉल’ हा एक नवीन रिअ‍ॅलिटी शो आहे आणि तो Amazon MX Player वर प्रसारित होईल. असे म्हटले जात आहे की, हा शो नेटफ्लिक्सच्या कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला टक्कर देईल. ‘शार्क टँक’फेम प्रसिद्ध उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर हे याचे सूत्रसंचालन करणार आहेत. या शोची संकल्पना काहीशी बिग बॉससारखीच आहे.

या शोमध्ये अर्जुन बिजलानी, किकू शारदा, धनश्री वर्मा आणि कुब्रा सैत यांसारख्या कलाकारांची एन्ट्री निश्चित झाली आहे. उर्वरित स्पर्धकांची लवकरच घोषणा केली जाईल.

किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात झालेले भांडण

काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्या भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. शोच्या रिहर्सलदरम्यान दोघेही वाद घालताना दिसले. व्हिडीओमध्ये कृष्णा अभिषेक इतका रागावला की त्याने त्याला सेटवरून निघून जाण्यास सांगितले असे दिसून आले. त्याच वेळी किकू त्याला सतत काहीतरी बोलतानाही दिसत आहे. दोघांमध्ये कशावरून वाद झाला हे स्पष्ट झालेले नाही.