कथित बॉयफ्रेंड लिएंडर पेससोबत किम शर्माने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

अभिनेत्री किम शर्मा ही तिच्या कथित बॉयफ्रेंड लिएंडर पेससोबत दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नुकतंच ती कथित बॉयफ्रेंडसोबत रोमॅण्टिक होताना दिसून आली.

Kim-Sharma-and-Leander-Paes-1200
(Photo: Kim Sharma/Instagram)

किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्यातील अफेअर हे सर्वांनाच माहितेय. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पण आता किम शर्माने लिएंडर पेससोबत शेअर केलेल्या आणखी नव्या फोटोमुळे दोघांच्या रिलेशनबाबत चर्चा सुरू झालीय. कारण या नव्या फोटोमध्ये दोघेही अतिशय रोमॅण्टिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. किमने बॉयफ्रेंडसोबतचा हा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात दोघेही एकमेकांच्या नजरेत बुडालेले दिसून येत आहेत.

या फोटोमध्ये किम शर्मा पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये अगदी गॉर्जिअस दिसून येतेय. तर लिएंडर पेस निळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये खूपच हॅंडसम दिसून येत आहे. या फोटोमध्ये लिएंडर किमकडे पाहताना दिसून येत आहे. तर किम कॅमेराकडे पाहून हसताना दिसून येतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kimi Sharma (@kimsharmaofficial)

आणखी वाचा : “या बाईने माझ्या भावाला फसवलंय”; प्रिया दत्तने संजय दत्तची पत्नी मान्यतावर केला होता आरोप

किम आणि लिएंडर हे दोघे एकत्र दिसण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी किम आणि लिएंडर दोघे गोव्यात सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये अफेअरची चर्चा सुरू झाली.

Kim-Sharma-and-Leander-Paes
(Photo: Lena Mukhi/Instagram)

आणखी वाचा : गोविंदाचा ‘मेरे प्यार का रस जरा चखना’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

किम याआधी युवराज सिंगसोबत सुद्धा रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांचं नातं चार वर्ष टिकलं. पण ब्रेकअपनंतर किम भारत सोडून निघून गेली. त्यानंतर तिने केनियाचा व्यापारी अली पणजनीशी लग्न केलं. या दोघांचंही लग्न फार काळ टिकलं नाही आणि ते दोन वर्षांच्या आतच वेगळे झाले. त्यानंतर किम फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्नाला डेट करत होती.

अगदी महिन्याभरापूर्वी जेव्हा किम शर्माने इन्स्टाग्रामवर लिएंडरसाठी एक स्पेशल पोस्ट लिहिली होती. तिने अटलांटा ऑलिम्पिकमधील लिएंडरच्या विजयाचा क्षणाचा एक जुना फोटो पोस्ट शेअर केला होता आणि त्याच्या कांस्य विजयाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त त्याचे अभिनंदन केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kim sharma shares romantic photo with rumored boyfriend leander paes prp