Ashok Saraf Birthday Special : विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अशोक मामा म्हणून का ओळखले जातात त्या मागची कहाणी जाणून घेणार आहोत.

निवेदिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ यांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘गुरू-शिष्य…, मोठी बहीण विजया, अशोक कुमारांची खूप मोठी चाहती..त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं. अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ, असे निवेदिता यांनी या फोटोला कॅप्शन दिले होते. या शिवाय त्यांनी अशोक सराफ अशोक कुमारांना गुरू स्थानी मानतात हे देखील सांगितले.

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारताती टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

आणखी वाचा : “केकेची हत्या केली”, ओम पुरी यांची पूर्वाश्रमीची पत्नी नंदिता यांचा धक्कादायक आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही काळापूर्वी त्यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम केलं होतं. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अशोक मामांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.