खासकरुन आपल्या अ‍ॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊट किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

टायगर श्रॉफप्रमाणेच त्याची बहिण कृष्णा श्रॉफदेखील फिटनेस प्रेमी आहे. कृष्णादेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जिममधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कृष्णा आणि टायगरमधील बहिण-भावाचं नातं अगदी पक्क असून अनेकदा दोघं एकत्र स्पॉट केले जातात.

कृष्णाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आणि काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने दिलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय. कृष्णाने शेअर केलेल्या फोटोत तिने टायगरला तिच्या खांद्यावर उचलून घेतलं आहे. तर पुढील व्हिडीओत टायगरला उचलून घेतलेलं असताना कृष्णाचा काहिसा तोल जात असल्याचं दिसतंय.

या पोस्टमधील एका व्हिडीओत टायगर श्रॉफ कृष्णाला ट्रेनिंग देताना दिसतोय. या व्हिडीओला कृष्णाने खास कॅप्शन दिलंय. “तो कायम माझ्या पाठिशी उभा असतो आणि मी त्याला कायम वर उचलून घेईन.” असं कॅप्शन तिने दिलंय. दोघांच्याही या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायगरने ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा ‘बागी’ हा चित्रपट हिट झालाय. आता तो ‘गणपत’, बागी ४ आणि हीरोपंती २ या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. चाहत्यांमध्ये टायगरच्या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.