अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलंय. अगदी कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘मीमी’ या सिनेमात तिने एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती. अनेकांनी तिचं या भूमिकेसाठी कौतुक केलं.
दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर क्रितीच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातूील ऑडिशनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत क्रिती खूपच निरागस दिसत आहे. या व्हिडीओत क्रितीने ती टू पीस म्हणजेच बिकिनी परिधान करण्यास कम्फर्टेबल नसल्याचं सांगितलं आहे. या व्हिडीओत तिने ऑडिशन देताना स्वत:ची ओळख सांगितली आहे. यावेळी ती २२ वर्षांची असल्याचं ती म्हणाली. कास्टिंग डायरेक्टरने क्रितीला पोहता येत का? असा प्रश्न विचारला आहे. यावर तिने हो असं उत्तर दिलंय मात्र “मी टू पीसमध्ये कम्फर्टेबल नाही” असं तिने पुढे सांगितलं आहे. क्रितीच्या ऑडिशनचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
जॉनी लीवरची मुलगी जेमीने केली सोनम कपूरची मिमिक्री, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सुरुवातीच्या काळात क्रितीने टू पीस म्हणजेच बिकिनी परिधान करण्यासाठी नकार दिला असला तरी सध्या मात्र क्रिती तिच्या बोल्ड अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. सोशल मीडियावर क्रिती सेनॉनचे अनेक ग्लॅमरस फोटो असून यात तिने स्विमसूट परिधान केलेले अनेक फोटो आहेत.
क्रितीने २०१४ सालामध्ये ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘बरेली की बर्फी’ , ‘दिलवाले’, ‘राबता’, ”पानिपत अशा सिनेमांमधून झळकली. लवकरच ती प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ सिनेमात झळकणार आहे.