बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर नेहमीच तो मोकळेपणाने त्याचं मत मांडताना दिसतो. केआरके आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमध्ये सतत वाद सुरु असतात. बऱ्याचवेळा केआरके सोशल मीडियावर सलमान विरोधात पोस्ट शेअर करत असतो. केआरके बऱ्याचवेळा सलमानवर नाव न घेता निशाणा साधत असतो.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. केआरकेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये खोटे सिक्स पॅक अॅब्स दिसत आहे. ती व्यक्ती ते खोटे सिक्स पॅक अॅब्स कसे वापरतात ते दाखवते. व्हिडीओ शेअर करत केआरके म्हणाला, “तुम्ही मला सांगू शकता का की बॉलीवूडमध्ये हे खोटे सिक्स पॅक अॅब्स कोण वापरत?”

Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video

आणखी वाचा : अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

केआरकेचं हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी सलमानचा फोट शेअर केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी सलमानचा व्हिडीओ शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर केआरकेलाच ट्रोल केले आहे.