अभिनेता कमाल आर खान(केआरके) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. ट्वीटद्वारे तो बॉलिवूड तसेच हिंदी चित्रपटांबाबत भाष्य करताना दिसतो. अनेकदा त्याच्या ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. केआरकेने याआधी राजकारणात येण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केआरकेने एका ट्वीटमध्ये आरएसएसला माझी गरज असल्यास मी सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. या ट्वीटमध्ये त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना टॅगही केलं होतं. आता त्याने पुन्हा आरएसएस संघात सहभागी होण्याबाबत ट्वीट केलं आहे. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये “मी आरएसएसमध्ये सहभागी होण्यासाठी नागपूरला जाणार आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> Big Boss 16 : ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे पुन्हा करणार कल्ला?, हिंदीच्या नव्या पर्वात दिसणार असल्याची चर्चा

हेही वाचा >> Video : ‘वाजले की बारा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह नोरा फतेहीने धरला ठेका; लावणी डान्सचा व्हिडीओ एकदा पाहाच

केआरकेच्या ट्वीटमुळे तो खरंच राजकारणात सक्रिय होणार का?, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्याच्या ट्वीटवर कमेंटही केल्या आहेत. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केआरकेने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’ या बॉलिवूड चित्रपटाबद्दलही ट्वीट केलं आहे.

हेही पाहा >> Photos : प्राजक्ता माळीला लंडनमध्ये करमेना, फोटो शेअर करत म्हणाली, “परदेशातील लोक विशेष माठ आहेत आणि…”

“माझ्या मित्राने विक्रम वेधा चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या मध्यापर्यंत हृतिक रोशनने बिग बी अमिताभ बच्चन यांची आणि मध्यांतरानंतर अल्लू अर्जुनची कॉपी केली आहे. ‘विक्रम वेधा’च्या क्लायमेक्समध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खानने १५ मिनिटे केवळ हवेत गोळीबार केला आहे. भोजपुरी चित्रपटातील अक्शन सीनपेक्षाही वाईट सीन चित्रित केले गेले आहेत. हा चित्रपट म्हणजे तीन तास डोक्याला ताप आहे”, असं म्हणत केआरकेने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटाला ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk to join rss said its confirmed and final tweet goes viral netizens react kak
First published on: 29-09-2022 at 17:33 IST