सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे यांच्यासह २० पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीला गेले आहेत. तर सत्ताधारी पक्षाने आरोप केला की भाजपा त्यांचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचत आहे. सोशल मीडियावरही यावरुन चांगलीच चर्चा सुरु आहे. यासगळ्यात कॉमेडियन कुणाल कामराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अग्निपथ योजनापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याच म्हटलं आहे.

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’चे अपयश ‘रक्षाबंधन’ पुसणार का? पाहा ट्रेलर

कुणालने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी “भारतीय सैन्याच्या मुद्द्यावरुन विचलित करण्यासाठी शिवसेनेचा उपयोग,” अशी पोस्ट कुणालने केली आहे.

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

आणखी वाचा : सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती घेणार घटस्फोट?

आणखी वाचा : “आजी हे फक्त तुझ्यासाठी…”, सायशा शिंदेचे नऊवारी साडीतील फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणालच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “बरोबर आहे. अग्निवीर मुद्द्यावरुन विचलित करण्यासाठी भाजपच्या म्हणण्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार गायब झाले. भाजपचे इतके मानत असतील तर विरोधात मतदान केले नसते.” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.