आमिर खान आणि करीना कपूर स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाकडून स्वतः आमिर आणि चित्रपट निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’च्या हिंदी रिमेकचं चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केले, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील चित्रपटाचे कौतुक केले परंतु बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दरम्यान, आमिर जवळपास दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार असल्याच्या असल्याचं बोललं जात आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ हा २०२२ मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती, तब्बल ४ वर्षांनंतर आमिर खानला पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकताही होती. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यासाठी सण आणि स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टयांमुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक येतील, अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही.
आणखी वाचा-‘लाल सिंग चड्ढा’ने हिट चित्रपटांना टाकलं मागे, भारतात सुपरफ्लॉप पण परदेशात कमावले ‘इतके’ कोटी

‘लाल सिंग चड्ढा’चे ओपनिंग विकेंड कलेक्शन ४५.८३ कोटी होते. प्रेक्षकांनी चित्रपटावर बहिष्कार घातल्याने आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग स्टारर चित्रपटाला मोठा फटका बसला. मिड डेच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाला अपयश आल्यानंतर आमिर खानने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो दोन महिने अमेरिकेत व्यतित करणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान गेल्या तीन वर्षांपासून अद्वैत चंदनच्या दिग्दर्शनात पूर्णपणे गुंतला होता. आमिर खानला आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टला सुरुवात करण्यापूर्वी थोडी विश्रांती घ्यायची आहे.

आणखी वाचा-Boyz 3 Trailer : “मराठीचा माज बेळगावात नाही दाखवायचा तर…” बहुचर्चित ‘बॉईज ३’चा ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लाल सिंग चड्ढा’च्या कामगिरीनंतर निराश झालेल्या आमिर खानला आता पुढील काही आठवडे आराम करायाचा असल्याचं बोललं जात आहे. या सुट्टीवरून परत आल्यानंतर आमिर खान पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू करेल. आगामी काळात आमिर खान ‘शुभ मंगल जादा सावधान’चे दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांच्यासह एका स्पोर्ट्स ड्रामाची तयारी करणार आहे. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झालेल्या Campeones या स्पॅनिश चित्रपटावर आधारित आहे. त्याचं शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.