सध्या स्टार प्रवाहवरील ‘लग्नाची बेडी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर मुख्य भूमिकेत आहे. सायली देवधरने या मालिकेमध्ये सिंधू ही भूमिका साकारली आहे. याआधी तिने अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केलेले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ ते अलिकडचीच ‘वैदेही’ या मालिकांमधील तिच्या कामाचं बरंच कौतुक झालं होतं. आता तिने ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या मालिकेत सायलीने एक किसिंग सीन दिला आहे. ज्याचा अनुभव तिने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

सायली देवधरनं अलिकडेच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव सांगितला. ‘लग्नाची बेडी’ मालिकेत सायली आणि अभिनेता संकेत पाठक यांचा एक किसिंग सीन आहे आणि हा सीन कसा शूट झाला हे मुलाखतीत सायलीनं सांगितलं. यासोबतच तिनं मालिकेच्या सेटवरील अनेक धम्माल किस्से आणि गंमती जमतीदेखील शेअर केल्या.

आणखी वाचा- Bhirkit Teaser: प्रेक्षकांमध्ये उडणार हास्याचे फवारे, बहुचर्चित ‘भिरकीट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सायली म्हणाली, “आता पारंपारिक मालिका पाहायला प्रेक्षकांना आवडत नाही. तेच ते रडके सीन किंवा रडणारी नायिका प्रेक्षकांना आवडत नाही. काही तरी त्यांना रोमँटिक पाहायचे असते. त्यामुळेच आम्ही आता मालिकेमध्ये किसिंग सीन देण्याचे धाडस केले आहे. माझ्यासाठी हे करणं फार कठीण होतं. हा सीन करताना मला खूप विचित्र वाटत होतं. हे प्रेक्षकांना कसं दिसेल. हे सर्व काय चाललं आहे अशा सर्व गोष्टी त्यावेळी डोक्यात होत्या. मात्र हा सीन मालिकेच्या कथेसाठी गरजेचा होता. त्यामुळे आता प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.”

आणखी वाचा- “तुम्ही अजूनही…” विवेक अग्निहोत्रींनी ट्विंकल खन्ना- शशी थरूर यांच्यावर साधला निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘लग्नाची बेडी’ ही मालिका स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. सध्या छोट्या पडद्यावर अशा प्रकारचा ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. या मालिकेत सायली देवधरसोबतच संकेत पाठक, रेवती लेले, अमृता माळवदर, मिलिंद अधिकारी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.