बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच लाराचा हिकप्स एंड हुकअप्स हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या शोच्या नावामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे. या व्यतिरिक्त लारा दोन वर्षं जुन फोन कव्हर वापरत असल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
रोहित भटनागरने लारासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात लाराने डेनिम जॅकेट परिधान केल्याचे दिसते. लाराच्या हातात एक फोन असल्याचे दिसते. मात्र, नेटकऱ्यांचे लक्ष हे लाराच्या फोन कव्हरने वेधले आहे. एक नेटकरी म्हणाला, मला तर वाटायचं की आमच्या सारखे लोकचं गरीब आहेत. पण आता लारा दत्तालाच बघा, तिने तिचं फोन कव्हर दोन वर्षांपासून बदललं नाही.
आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?
आणखी वाचा : लग्नाआधीच विकी आणि कतरिनामध्ये झालं जोरदार भांडण? ‘हे’ ठरलं कारण…
या प्रश्नावर उत्तर देत लारा म्हणाली, तुम्ही बरोबर बोललात. कारण काही गोष्टींना भावनिक मूल्यही असतात. लाराच्या या उत्तरावर अनेक नेटकऱ्यांनी ती बरोबर बोलते असं म्हटलं आहे. दरम्यान, हिकप्स एंड हुकअप्स या शोमध्ये लारा एका ४० वर्षाच्या सिंगल मदरची भूमिका साकारते. या शोमध्ये प्रतीक बब्बर आणि शिनोवा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.