बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लारा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. लारा दत्ता ही नेहमी तिच्या स्पष्टवक्तपणासाठी ओळखले जाते. नुकतंच लारा दत्ताने सॅनिटरी नॅपकिन्स, अल्कोहोल ब्रँड आणि सिगारेटची जाहिरात करणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच याचे कारणही तिने जाहीर केले आहे.
लारा दत्ताने गेल्या काही वर्षात स्वयंपाकाचे तेल, तृणधान्ये, टूथपेस्ट आणि बाईक्सच्या जाहिरातीत काम केले आहे. लारा दत्ताने २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकवला होता. त्यानतंर ती अनेक चित्रपटात काम केले होते. २००३ मध्ये तिने ‘अंदाज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘मस्ती’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘झूम बराबर झूम’, ‘पार्टनर’, ‘हाउसफुल’, ‘चलो दिल्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
नुकतंच कॅम्पेन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत लाराला जाहिरातींबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तू आतापर्यंत कधीही कोणत्याही ब्रँड किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहेस का?’ त्यावर लारा म्हणाली, “हो. मी जर ते एखादे उत्पादन वापरत नसेल तर मी त्याची जाहिरात करत नाही. मी अल्कोहोलच्या कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत नाही. पण मला असं वाटतं की एखाद्या जाहिरातीचा मजकूर किंवा विषय हा महत्त्वाचा असतो.”
“जेव्हा जेव्हा माझ्याकडे जाहिराती येतात तेव्हा त्यासाठी मला आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागतो. पण अल्कोहोल ब्रँडच्या जाहिरातींचे असं नसतं. मी सिगारेटची जाहिरात कधीही करणार नाही. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात एका सॅनिटरी नॅपकिन्सच्या ब्रँडने माझ्याशी संपर्क साधला होता आणि मी ती करण्यास नकार दिला होता”, असेही लाराने सांगितले.
Lock Upp: अभिनेत्री पूनम पांडे घेणार कंगना रणौतशी पंगा, पॉर्न केसमध्ये आले होते नाव
“पण माझा प्रामाणिकपणे विश्वास आहे की यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांवर लक्ष देण्याची जास्त गरज आहे. आज महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात वापरण्यासाठी मेन्स्ट्रुअल कपप्रमाणे इतर पर्याय उपलब्ध आहेत. तो अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे मला भविष्यात अशा प्रकारच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्षम व्हायचे आहे. तसेच जे उत्पादन मी वापरणार नाही. त्याचे मी यापुढे समर्थन करणार नाही”, असेही तिने यात म्हटले.