बॉलिवूडमधील क्यूट कपल आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागल्या आहेत. आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी देखील सुरु केल्याचं म्हंटलं जातंय. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील आलिया आणि रणबीर लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची सूचक वक्तव्य केली आहेत. यातच आता अभिनेत्री लारा दत्ताने देखील आलिया रणबीरच्या लग्नाविषयी एक खुलासा केलाय.

टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत लारा दत्ताने आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा उल्लेख केलाय. आलिया आणि रणबीर या वर्षातच लग्न करतील असं लारा म्हणालीय. लारा म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच रणबीर आलिया आणि त्याच्या लग्नाबद्दल बोलला होता. तेव्हा तो म्हणाला होता की जर करोना माहामारहीचं संकट नसतं तर त्यांचं लग्न एव्हाना झालं असतं.” लाराच्या या खुलास्यानंतर आलिया आणि रणबीर यांच यावर्षीच लग्न होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

हे देखील वाचा: …आणि अक्षय कुमारने घेतले चक्क कपिल शर्माकडून आशिर्वाद

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची अगदी खासगित तयारी देखील सुरु झाल्याच्या चर्चा आहेत. वृत्तांनुसार आलिया आणि रणबीर लग्नानंतर वांद्रे इथल्या त्यांच्या नव्या घरी शिफ्ट होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान लवकरच आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात एकत्र झळकणार आहेत.

तर लारा दत्ता अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ सिनेमात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येतेय. या सिनेमात ती भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांंधी यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील लाराचा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.