सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झाले आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट सहज वाऱ्यासारखी येथे पसरली जाते. यात अनेक वेळा व्हायरल व्हिडीओ, फोटो यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत. विशेष म्हणजे याच सोशल मीडियामुळे अनेक जण रातोरात सुपरस्टारदेखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यातच गानसम्राज्ञी लत मंगेशकर यांनीदेखील एका तरुणीच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करुन तिला आशीर्वाद दिले आहेत.

लता मंगेशकर यांनी ट्विटरवर एका तरुणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ही तरुणी ऑस्ट्रियामधील प्रसिद्ध संगीतकार माझार्ट यांचं गाणं म्हणताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलीचा गोड आवाज ऐकल्यानंतर लता मंगेशकर यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिला आशीर्वाद दिले आहेत.

“नमस्कार, मला हा व्हिडीओ कोणीतरी पाठवला आहे. या मुलीने ऑस्ट्रियातील महान संगीतकार माझार्ट यांची ४० वी संगीतरचना G minor ला भारतीय पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केलं आहे. ही एक उत्तम गायिका व्हावी यासाठी माझ्याकडून तिला अनेक आशीर्वाद”, अशी पोस्ट लता मंगेशकर यांनी शेअर केली आहे.


दरम्यान, सध्या या तरुणीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत या माध्यमातून राणू मंडल, डान्सिंग अंकल असे अनेक जण रातोरात फेमस झाल्याचं पाहायला मिळालं.