भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी करोना आणि न्यूमोनियाची लागण झाली. त्यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशाभरातून लोक प्रार्थना करत आहे. आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लता मंगेशकर या अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत आणि आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. वय अधिक असल्यामुळे त्यांना रिकव्हर होण्यास वेळ लागेल: अशी माहिती लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी दिली आहे. लता दीदी या लवकर ठिक होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

गुरुवारी १३ जानेवारीला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होत आहे. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी म्हणाले, “त्या अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत. पण त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली.

याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar health update she is still in the icu ward avb
First published on: 18-01-2022 at 09:38 IST