प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. सुरेखा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हैदराबादच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (२२ जून) पक्षप्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे राजकीय पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आपल्या घुंगरांच्या तालावर सगळ्यांना नाचवणाऱ्या आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या लोकप्रिय नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आणखी वाचा : “तिला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या पण…” सुरेखा पुणेकरांचा सणसणीत टोला

सुरेखा पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. पण आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या बीआरएस पक्षात सुरेखा यांनी प्रवेश केला आहे. सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैदराबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक भेटीगाठीही घेतल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.

सुरेखा यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुरेखा पुणेकर या ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. बिग बॉसमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.