लग्नकार्य म्हटलं की त्यासोबत ३००-४०० लोकांचा गोतावळा तर सहजच येतो. अनेकजण योग्य पद्धतीने आमंत्रण मिळालं नाही म्हणून रुसूनही बसतात. बॉलिवूडमधील कोणाचे लग्न असेल तर त्यांचे नातेवाईकच नाही तर संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष त्यांच्या लग्नाकडे लागून राहिलेलं असतं. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी स्वतःच्या लग्नात एकाही बॉलिवूड कलाकाराला बोलावले नव्हते. चला तर मग नक्की ते कोण कलाकार आहेत ते पाहूया…

अमिताभ बच्चन-जया बच्चन
अमिताभ आणि जया यांनी ३ जून १९७३ मध्ये अगदी साधेपणाने लग्न केले. त्यांच्या लग्नात वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासह फक्त पाच लोकच उपस्थित होती. या पाच जणांमध्ये गुलझार होते. जया यांच्याबाजूने त्यांचे आई-वडील, बहिण, अभिनेता असरानी आणि फरीदा जलाल लग्नात सहभागी झाले होते. लग्नानंतर दिलेल्या रिसेप्शनमध्ये संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीला आमंत्रण देण्यात आले होते.

संजय दत्त-मान्यता
बॉलिवूडमध्ये संजय दत्तचे दुसरे नाव बाबा आहे. संजयने ७ फेब्रुवारी २००८ मध्ये ४९ व्या वर्षी मान्यताशी लग्न केले. संजयचे हे तिसरे लग्न आहे. संजयचे पहिले लग्न रिचा शर्मा तर दुसरे लग्न रिया पिल्लईसोबत झाले होते. मान्यताचेही हे दुसरे लग्न आहे. दोघांनी अगदी कमीत कमी माणसांच्या उपस्थितीत गोव्यात लग्न केले होते.

राणी मुखर्जी-आदित्य चोप्रा
राणी आणि आदित्य यांच्या अफेअरच्या चर्चा कानावर पडत होत्याच. पण दोघांनी कधीही याबद्दल स्पष्टिकरण दिले नाही. दोघांनी २१ एप्रिल २०१४ मध्ये इटलीत लग्न केले. या दोघांच्या लग्नाची खासियत म्हणजे दोघांच्या लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर अजूनपर्यंत सापडलेला नाही.


प्रीति‍ झिंटा-जीन गुडइनफ
बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळख असलेल्या प्रिती झिंटाने अमेरिकेतील प्रियकर जीन गुडइनफशी अमेरिकेतच २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये लग्न केले. या लग्नालाही बॉलिवूडमधील कोणीही उपस्थित नव्हते.


धर्मेंद्र-हेमा मालिनी
शोले सिनेमाच्या चित्रीकरणावेळीच धर्मेंद्र यांना हेमा मालिनी आवडू लागल्या होत्या. दोघांनी धर्म बदलून दुसरे लग्न केले. दोघांनी खंडाळ्यात लग्न केले. धर्मेद्र यांना पहिली पत्नी प्रकाश कौर असून सनी आणि बॉबी ही दोन मुलंही आहेत. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.

धर्मेंद्र आणि हेमामालिनी

श्रीदेवी-बोनी कपूर
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रीदेवीने आपल्याहून आठ वर्षे मोठ्या असलेल्या बोनी कपूरसोबत १९९६ मध्ये लग्न केले . तेव्हा श्रीदेवी यांचे वय ३३ वर्ष होते. बोनी यांचे पहिले लग्न मोना शौरी कपूर यांच्याशी झाले होते, तर श्रीदेवीही मिथून चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. असे म्हटले जाते की, जेव्हा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केले तेव्हा श्रीदेवी गरोदर होती.

श्रीदेवी आणि बोनी कपूर

कुणाल कपूर-नैना बच्चन
कुणाल कपूरने अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चनशी सेशेल्स आयलॅण्डवर जाऊन लग्न केले. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबियच उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनी मुंबईमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन दिले.

सेलिना जेटली-पीटर हाग
सेलिना जेटलीने पीटर हागशी २०११ मध्ये लग्न केले. या लग्नाचीही कुठेही वाच्यता झाली नाही. त्यांनी बॉलिवूडमध्ये कोणालाही आमंत्रण दिले नव्हते. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यावर सेलिनाने लग्न केल्याचे साऱ्यांना कळले. लग्नाच्या एक महिन्यानंतर तिने लग्न झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले.

जॉन अब्राहम-प्रिया रुंचाल
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू हे २००२ पासून २०११ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. पण काही कारणांमुळे दोघांचे नाते तुटले. दोघांचे नाते तुटण्यात प्रिया रुंचाल कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. २०१० मध्ये जॉनची प्रियासोबत ओळख झाली. दोघांनी ३ फेब्रुवारी २०१४ मध्ये लॉस एँजेलिसमध्ये लग्न केले.

अरिजीत सिंह-कोयल रॉय
बॉलिवूडचा आघाडीचा गायक अरिजीत सिंगने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याची बालपणीची मैत्रीण कोयल रॉयशी लग्न केले. २० जानेवारी २०१४ मध्ये पश्चिम बंगालच्या तारापीठ मंदिरात हे लग्न पार पडले. त्याची पहिली पत्नी त्याच्यासोबत एका रिअॅलिटी शोमध्ये होती. पण ती कोण होती याचा अजूनही खुलासा होऊ शकला नाही.

आमिर खान-रीना दत्त
आमिर खान आणि रीना दत्त यांनी ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच १८ एप्रिल १९८६ मध्ये लग्न केले होते. पण त्यांच्या लग्नाबद्दल फारसे कोणालाच माहित नव्हते. अनेक वर्षांनी आमिर खानच्या लग्नाची बातमी साऱ्यांना कळली.

आमिर खान-रिना.

माधुरी दीक्ष‍ित-श्रीराम नेने
माधुरी दीक्षितनेही डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये लॉस एंजेलिस येथे भावाच्या घरी लग्न केले. त्यांच्या लग्नात फार जवळचे मित्र-मैत्रिणीच उपस्थित होते.

१७ ऑक्टोबर १९९९ साली माधुरी विवाहबद्ध झाली.

जूही चावला-जय मेहता
जुही चावलाने तिचे करिअर उच्चांकावर असताना उद्योजक जय मेहताशी लग्न केले. तिने आपले लग्न अनेक वर्ष प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवले. जुही गरोदर होती तेव्हा तिचे आधीच लग्न झाले असल्याचे अनेकांना कळले. २००१ मध्ये जुहीने मुलीला जन्म दिला.

जुही चावला-जय मेहता.

दिव्‍या भारती-साजिद नाडियाडवाला
दिव्या भारतीने निर्माते साजिद नाडियाडवालाशी १० मे १९९२ मध्ये लग्न केले होते. दिव्याचे निधनही अनपेक्षीतरित्या लवकर झाले. तिचा मृत्यू जसा अनेकांना धक्का देऊन गेला त्याचपद्धतीने तिचे लग्न आधीच झाले आहे हाही तिच्या चाहत्यांना तेव्हा धक्काच होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिनिषा लांबा-रेयान थाम
‘किडनॅप’ आणि ‘बचना ऐ हसीनो’ मधील अभिनेत्री मिनिषा लांबाने ६ जुलै २०१५ ला प्रियकर रेयान थामशी लग्न केले. रेयान नाइट क्लब्सचा मालक आहे. रेयान हा अभिनेत्री पूजा बेदीचा चुलत भाऊही आहे.