‘डिज्नी’ने प्रियांकाच्या आवाजातील ‘द जंगल बुक’च्या हिंदी ट्रेलरनंतर आता दुसरा ट्रेलर प्रसिद्ध केला आहे.
मूळ इंग्रजी चित्रपट असलेल्या हिंदी आवृत्तीसाठी अभिनेता नाना पाटेकर, ओम पुरी, इरफान खान, प्रियांका चोप्रा आणि शेफाली शहासारख्या बॉलीवूड कलाकारांच्या टीमने आवाज दिला आहे. तर चित्रपटात मोगलीची भूमिका नील सेठ या भारतीय पण अमेरिकावासी असलेल्या लहान मुलाने केली आहे. नाना पाटेकर यांच्या आवाजातील शेरखानची डरकाळी पुन्हा एकदा या ट्रेलरमधून ऐकायला मिळते. अभिनेता इरफान खानने भालूला आवाज दिला असून याआधीही ‘डिस्ने’च्या ‘प्लेन’ या अॅनिमेशनपटासाठी आवाज देणाऱ्या प्रियांकाने ‘का’साठी आवाज दिला आहे. ‘रक्षा’ या कोल्ह्य़ासाठी शेफाली शहाने आवाज दिला आहे. नाना पाटेकरांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या भारदस्त आवाजात बघीराचे संवाद ऐकू येतात.
‘द जंगल बुक’ हा चित्रपट भारतात ८ एप्रिलला प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: नाना पाटेकर, ओम पुरी यांच्या आवाजातील ‘द जंगल बुक’चा ट्रेलर
नाना पाटेकर यांच्या आवाजातील शेरखानची डरकाळी ट्रेलरमध्ये ऐकायला मिळते.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 22-03-2016 at 12:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Listen to nana patekar om puri irrfan khan and priyanka chopra in hindi trailer of the jungle book