काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा शो प्रदर्शित झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. या शोमधील स्पर्धक लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसत आहेत. त्यात आता स्पर्धक अंजली अरोराने तिच्या आयुष्यातील एक खुलासा केला आहे.

AltBalaji च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत कंगना अंजलीला तिच्या भूतकाळातील कोणत्याही एका गोष्टीचा खुलासा करण्यास सांगते. यावेळी अंजली म्हणाली, “डिसेंबरमध्ये मी रशियाला गेले होते आणि मी अजून कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नव्हते. माझ्या हॉटेलचा रिसेप्शनिस्ट मला आवडला आणि मी त्याच्याकडून ५ हजार रुबल म्हणजेच २ हजार ७३७ रुपये घेतले. मला फक्त पैसे हवे होते. मी त्याच्याकडे पैसे मागितले आणि त्याने मला दिले. त्या दिवशी शनिवारी रात्री पार्टी होती आणि त्याने मला पार्टीला सोबत ये असं सांगितलं. आम्ही एकत्र पार्टी करायला गेलो. माझ्या कोणत्याही मित्र-मैत्रीणीला याविषयी माहित नाही आणि माझ्या आई-वडिलांदेखील माहित नाही. आता त्यांची यावर कशी प्रतिक्रिया असेल हे सुद्धा मला माहित नाही.”

आणखी वाचा : “आरव कोणाला सांगत नाही की तो माझा मुलगा आहे कारण…”, अक्षय कुमारने केला होता खुलासा

आणखी वाचा : जिनिलिया माहेरी जाणार ऐकताच, रितेश देशमुखने गायलं हे गाणं; Video पाहून हसू आवरणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉक अप हा शो २७ फेब्रुवारी रोजी ALTBalaji आणि MX Player प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये द जजमेंट डे असा एक एपिसोड असतो. यावेळी स्पर्धकांना त्यांच्या कोणत्या खासगी गोष्टीचा खुलासा करावा लागतो. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी एका स्पर्धकाला शोमधून काढले जाते. शोमध्ये १६ वादग्रस्त सेलिब्रिटींना अनेक महिने लॉक-अपमध्ये ठेवण्यात येते.