करोना कालावधीपासून ते अगदी आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवणारा शो म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर यासारखे जुने कलाकार असो किंवा दत्तू मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने असो या साऱ्या कलाकारांनी साकारलेली पात्र आणि सादर केलेले स्किट्स हे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहचली आहेत. याच कार्यक्रमात हास्यवीर म्हणून सहभागी झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’वरील विशेष मुलाखतीमध्ये एक खास प्रश्नाचं अखेरीस उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या हास्यजत्रा या सेटवरचा आणि त्यातील कलाकारांचा प्रश्न लोकसत्ताच्या टीमने ‘डिजीटल अड्डा’च्या वेळी प्रसादला विचारला. हा प्रश्न म्हणजे हास्यजत्रा या शोच्या कलाकरांना आता धर्मवीर हिट झाल्यावर पार्टी कधी देणार? यावर प्रसादने सागितलं की, ” हिरकणी नंतर मी पार्टी देणार होतो मी. पार्टी दिलेली नाही कबूल करतो. हिरकणीला १०० दिवस पूर्ण झाल्यावर पार्टीचा हा विषय सुरु झाला. ज्या दिवशी शुटिंग असत त्याच्या आदल्या दिवशी रीहसलसाठी सगळे येतात त्याच दिवशी मी पार्टी द्यायची ठरवलं. त्याच वेळी शुटिंग कॅन्सल झालं. तेव्हा पासून लोक मज्जा घेत आहेत.”

” यानंतर चंद्रमुखीच काम सुरु झालं. मग करोना आला. लॉकडाऊन मध्ये कशी पार्टी देणार. तरी आम्ही त्यावेळी बायोबबलमध्ये दमणमध्ये शूट करत होतो. त्यात हे पार्टी प्रकरण जास्त व्हायरल झालं. मी तिकडेही पार्टीची व्यवस्था केली. याची माहिती मिळताच चॅनेलचे हेड आणि अमित फाळके हे धावत दमणला आले. पार्टी दिली तर एपिसोड मधले पंचेस संपतील आणि हे पंचेस संपू नये म्हणून तु जास्तीत जास्त लांबव पार्टी. हेच खर कारण आहे”

(हे ही वाचा: “पावसाचं पाणी साचतं तेवढं पाणी विगच्या खाली…”; प्रसादने सांगितला शुटिंग दरम्यानचा मेकअपचा अनुभव)

नुकतच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी, धर्मवीर अशा चित्रपटांची मिळून प्रसाद हास्यजत्रेच्या कलाकारांना लवकरच पार्टी देणार असल्याचं त्याने सांगितलं.

Digital Adda : धर्मवीर चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से अन् प्रसाद ओक’ पाहा खालील व्हिडीओमध्ये

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta exclusive when will you give a party to the hasyajatra team prasad oak finally gave the answer ttg
First published on: 13-05-2022 at 19:16 IST