सुपरस्टार सलमान खानने त्याचा आगामी सिनेमा ‘लव्हरात्री’साठी ‘लडकी मिल गयी’ असं ट्विट काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याच्या या ट्विटने अनेकांना आता अखेर सलमानचे लग्न होणार असे वाटले होते. सलमानला सापडलेल्या मुलीचे नाव वरिना हुसेन असून ती आयुष शर्मासोबत ‘लव्हरात्री’ सिनेमात दिसणार आहे. नुकताच सलमानने आयुष आणि वरिनाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सध्या सलमान एकाचवेळी ‘भारत’ आणि ‘लव्हरात्री’ अशा दोन सिनेमांवर काम करत आहे. सलमान खानची बहिण अर्पिता खानचा नवरा आयुष ‘लव्हरात्री’तून सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. स्वतः सलमान या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

वरिनाचा बॉलिवूडमधल्या एण्ट्रीचा ‘पासवर्ड’ हे डेअरी मिल्क चॉकलेटच आहे असं अनेक जण मानतात. गेल्यावर्षी वरिना कॅडबरी डेरी मिल्कच्या एका जाहिरातीत दिसली होती. तिने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहूनच तिची या सिनेमासाठी निवड झाली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. वरिनाने न्यूयॉर्क फिल्म अॅकाडमीमधून अभिनयाचे धडे घेतले आहे.

गुजरातच्या पाश्वभूमीवरील ‘लवरात्री’ ही एक प्रेमकथा असून या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहे. अभिराजचाही दिग्दर्शन क्षेत्रातील हा पहिला सिनेमा आहे. याआधी त्याने अनेक सिनेमांसाठी सह- दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल. सध्या आयुष त्याच्या या पहिल्या सिनेमासाठी विशेष मेहनत घेत आहे. वरीना या सिनेमात बेले डान्सर दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ती आणि आयुष बॅले डान्सचे धडे गिरवताना दिसत आहेत.