scorecardresearch

कंगनाला घेऊन चित्रपट करणार का? दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले, “ती खूप.. “

या चित्रपटात तमन्ना भाटिया एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

कंगनाला घेऊन चित्रपट करणार का? दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले, “ती खूप.. “
actor director

बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी, रोहित शेट्टी, करण जोहर, अनुराग कश्यपसारखे प्रख्यात दिग्दर्शक आहेत. त्याच बरोबरीने आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकरसारखे मराठमोळे दिग्दर्शक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चित्रपटातून समाजाचा आरसा दाखवणारे दिग्दर्शक मंधूर भांडारकर सध्या चर्चेत आहेत. त्यांचा ‘इंदु सरकार’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. आता ते नवीन चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येत आहे त्या चित्रपटाचं नाव आहे ‘बबली बाउंसर’. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.

नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात कंगना बरोबर काम करण्याबद्दलचा खुलासा केला आहे. मागे एक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की मधुर भांडारकर कंगना रणौतला घेऊन एक चित्रपट बनवत आहे. या बातमीने कंगनाच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. पण आता दिग्दर्शकाने हे फेटाळून लावले आहे.मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे. ‘कंगना खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि आम्ही अनेकदा भेटतो. आमच्यातही बोलणी सुरू आहेत, पण सध्या मी फक्त ‘बबली बाउन्सर’वर लक्ष केंद्रित केले आहे’.

मोबाईलमधील सिमकार्डपासून बनवला ड्रेस, उर्फीचा नवा अतरंगी अंदाज बघा

‘बबली बाउंसर या चित्रपटात मधुर भांडारकर पहिल्यांदाच तमन्ना भाटिया या अभिनेत्री बरोबर काम करत आहेत. याआधी त्यांनी तब्बू, प्रियांका चोप्रा, करीना कपूर या आघाडीच्या अभिनेत्रींनबरोबर काम केलं आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया एका हटके भूमिकेत दिसणार आहे. मधुर भांडारकर आपल्या चित्रपटांमध्ये स्त्री पात्र केंद्रस्थानी ठेवतात. मधुर भांडारकर यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

मधुर भांडारकर तमन्नाचा ‘बबली बाउन्सर’ हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी हरियाणातील दाखवली आहे. दोघे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या यशासाठी मधुर भांडारकर, तमन्ना भाटिया लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhur bhandarkar react on reports of teaming up with kangana ranaut said nothing is happening right now spg

ताज्या बातम्या