बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सुपरहिट चित्रपट तिने किती वेळा पाहिला? असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला या प्रश्नावर माधुरीने थक्क करणारे उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाली माधुरी?

माधुरी म्हणाली, “हम आपके हैं कौन हा चित्रपट मी इतक्या वेळा पाहिला आहे, की आता सांगताही येणार नाही.”

‘हम आपके हैं कौन’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे. सलमान खान, रिमा लागू, आलोक नाथ, रेणूका शहाणे, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक नामांकित कलाकारांनी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट विशेष गाजला तो गाण्यांमुळे. या चित्रपटात तब्बल १४ गाणी होती. ‘हम आपके हैं कौन’मुळे माधुरी दीक्षित रातोरात सुपरस्टार अभिनेत्री झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit on hum aapke hain koun mppg
First published on: 28-04-2020 at 19:18 IST