सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुधीर फडके यांच्या भूमिकेत सुनील बर्वे, तर त्यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पाहायला मिळणार आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मधील ललिताबाई फडके यांची भूमिका मृण्मयी देशपांडेला एका रीलमुळे मिळाली, याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.

अलीकडेच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी ‘राजसी मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी बोलताना मृण्मयीने चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सांगितलं. तिला विचारलं की, या चित्रपटाची सुरुवात एकंदरीत कशी होती? तेव्हा मृण्मयी म्हणाली, “सुरुवात खूप धमाल झाली. माझ्याबाबतीत अशी सुरुवात याच्याआधी कधीच घडली नव्हती. मी सहज एकेदिवशी साडी नेसून लांब केसांची वेणी घालत रील केली होती. मी ती रील इन्स्टाग्रामवर सहज पोस्ट केली. त्या रीलला मी बाबूजींचं गाणं वापरलं होतं.”

हेही वाचा – “अंडी-ब्रेड खाऊन काढले दिवस…”, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ५ हजार रुपये घेऊन आली होती मुंबईत, सांगितला ‘तो’ संघर्षाचा काळ

“ती रील पोस्ट केल्यानंतर मला दोन दिवसांत योगेश देशपांडेंचा फोन आला. मृण्मयी आम्ही तुझाच विचार करत होतो आणि तुझी ती रील पाहिली, जी पोस्ट केली आहेस. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की, तू ललिताबाईंच्या भूमिकेसाठी शोभून दिसशील. तुला करायला आवडेल का? अर्थातच नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कधी कधी असं असतं की आपण काही भूमिका निवडतो आणि कधी कधी असं होतं की, काही भूमिका आपल्याला निवडतात. तर तसंच यावेळेस माझ्याबरोबर झालं. मला भूमिकेने निवडलं,” असं मृण्मयी म्हणाली.

हेही वाचा – ‘मास्टरशेफ इंडिया’ फेम कुणाल कपूरचा झाला घटस्फोट, पत्नीच्या त्रासाला कंटाळून हायकोर्टात घेतली होती धाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे यांच्याव्यतिरिक्त सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), मिलिंद फाटक (राजा परांजपे), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार) ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.