महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या महामिनिस्टर या नवीन पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. हे या पर्वाचे खास आकर्षण ठरत आहे. नुकतंच ‘झी मराठी’ने या पैठणीची निर्मिती करत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीने काही तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत या ११ लाखांची पैठणीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात येत आहे. हा व्हिडीओ दोन मिनिटांचा आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडीओत मागावर काम करणारे कलाकार, त्यांच्या लयबद्ध हालचाली आणि त्या मागाचा आवाज या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला आदेश बांदेकर यांनी स्वत: निवेदन दिले आहे.

“ती ११ लाखांची पैठणी मी देणार नाही…”, आदेश बांदेकरांनी ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

या व्हिडीओची सुरुवात कशी तयार झाली ११ लाखांची पैठणी? या प्रश्नाने होते. यानंतर आदेश बांदेकर ११ लाखांच्या पैठणीबद्दल अनेक प्रश्न विचारतात. ‘ही पैठणी बनणार कुठे, ही पैठणी कशी असणार? असे असंख्य प्रश्न घेऊन येवल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. येवल्यानंतर गेल्यानंतर जे पाहिलं ते पाहून थक्क झालो’, असे आदेश बांदेकर म्हणाले.

यानंतर या व्हिडीओत चित्र रेखाटण्यापासून बारीक विणकामापर्यंतचा पैठणीच्या निर्मितीचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. ही ११ लाखांची पैठणी दिव्यांग कलाकारांनी तयार केली आहे. नाशिकमधील येवला हे पैठण्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. ही ११ लाखांची पैठणी येवल्यात तयार झाली आहे. मात्र तिची निर्मिती बोलता आणि ऐकता न येणाऱ्या कलाकारांनी केली आहे.

“तिच्या कपाटात ११ लाखांची पैठणी का असू नये?”, ‘महामिनिस्टर’वर होणाऱ्या टीकांवर आदेश बांदेकरांनी दिले सडेतोड उत्तर

‘या पैठणीला अस्सल सोन्याची जर आणि हिरे असले तरी दिव्यांग कलाकारांच्या कौशल्यामुळे या पैठणीचं तेज आणखी वाढलं आहे. ते एकमेकांशी हातवारे करून आनंद व्यक्त करत होते. त्यांच्या डोळ्यात बऱ्याच गोष्टी आम्हाला दिसल्या. त्यांच्या हातांनी एकाग्रतेने साकारलेली ती कलाकृती पाहून आम्ही धन्य झालो’, असेही आदेश बांदेकर यांनी यावेळी म्हटलं. ‘या ११ लाखांच्या पैठणीतून अशा व्यक्तींना रोजगार मिळाल्याचा आनंद ही झाला. छान काही तर घडवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता’, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha minister here a glimpse of the winner rs 11 lakh paithani saree in making video viral nrp
First published on: 22-04-2022 at 13:41 IST