Kangana Ranaut Instagram Video on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २९ जून रोजी जनतेशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्री कंगना रणौतने देखील आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “महाराष्ट्राची जनता जिंकली”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आरोह वेलणकरचं ‘ते’ ट्विट चर्चेत

राजकीय वाद असो वा एखादी घटना कंगना आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. आता देखील तिने १ मिनिटाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. शिवाय हनुमान चालीसाविषयी देखील कंगणाने स्पष्ट बोलणं पसंत केलं. तिचा या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

काय म्हणाली कंगना रणौत?
“१९७५नंतर आताचा काळ हा भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण आहे. १९७५ मध्ये लोकनेते जेपी नारायण यांनी ‘सिंहासन खाली करा’ असं म्हंटल्यानंतर सिंहासन पडलं होतं. २०२०मध्ये मी म्हटलं होतं की, लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारामुळे जो हा विश्वास तोडतो, त्याच्या अहंकाराचाही अंत होणं निश्चित आहे. ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीची शक्ती नाही, ती एका खऱ्या चारित्र्याची शक्ति आहे.”

आणखी वाचा – “खरंच वाईट वाटतंय कारण…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमे झाला भावूक

पुढे बोलताना ती म्हणाली, “हनुमानजी यांना भगवान शंकराचा बारावा अवतार मानलं जातं. शिवसेनेने जर हनुमान चालिसावरच बंदी आणली तर, त्यांना भगवान शिव देखील वाचवू शकणार नाही. हर हर महादेव, जय हिंद जय, महाराष्ट्र” कंगनाने या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन देखील लक्षवेधी आहे. ते कॅप्शन म्हणजे, “जेव्हा पाप वाढतं तेव्हा विनाश होतोच आणि सृष्टीची निर्मिती होते. आयुष्याचे कमळ फुलते.”

तासाभरातच २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी कंगनाचा हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच अनेक जणांनी कंगनाच्या या व्हिडीओला पाठिंबा दिला आहे. “तू एकदम बरोबर बोललीस” असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, “हर हर महादेव.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government political crisis marathi actress kangana ranaut video on cm uddhav thackeray resign see details kmd
First published on: 30-06-2022 at 13:54 IST