‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.

अमित फाळके हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते अनेकदा महाराष्ट्राची जत्रा या कार्यक्रमाबद्दल पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी सई ताम्हणकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहे. यात ते दोघेही निराश असल्याचे दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी ‘सीझन रॅप सून… म्हणजेच पर्व लवकरच संपणार’ असे म्हटले आहे.

What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाला “हा नवीन भारत…”

‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील चालू सीझन लवकर संपणार असल्याचे कळताच अनेक चाहते नाराज झाले आहेत. त्यावर अनेकांनी ‘नाही’, ‘असे करु नका’, ‘असे करु नका सर’, अशा कमेंट पाहायला मिळत आहे. मात्र यात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

अमित फाळके यांनी या फोटोनंतर आणखी एक नवी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्राजक्ता माळीसोबतचा हसरा फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी ‘न्यू सीझन सून…’ म्हणजे ‘नवे पर्व लवकरच’ असे म्हटले आहे. यानंतर चाहत्यांना हा सर्व प्रकार समजला आहे.

“आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम २०१८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. लवकरच याचे नवे पर्व पाहायला मिळणार आहे. यात नक्की काय नवीन असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हे गुपित उलगडणार आहे.