अभिनेता महेश बाबू याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जाते. अभिनेता महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. महेश बाबूच्या आईच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

महेश बाबू यांची आई वृद्धपकाळामुळे अनेक आजारांशी झुंज देत होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवार (२८ सप्टेंबर) सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने हिने इन्स्टाग्रामवर एक छान पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या सासूबाईंचा एक फोटो शेअर केला आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

“आम्हाला तुमची खूप आठवण येईल… तुम्ही दिलेले प्रेम आणि आठवणी आमच्याबरोबर कायम असतील. मी तुमच्या मुलावर, नातवंडांवर आणि कुटुंबावर कायम प्रेमाचा वर्षाव करेन. आई…माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम असेच अखंड राहिल”, असे नम्रता शिरोडकरने म्हटले. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : ‘महेश बाबू मराठीमध्ये बोलू शकतो का?’ नम्रता शिरोडकर म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारु यांनी दुसरे लग्न केले होते. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. पतीपासून विभक्त झाल्यानंतर इंदिरा देवी या एकट्याच राहत होत्या. पण महेश बाबू आणि इतर कुटुंबीय त्यांच्याकडे वारंवार जात-येत असत. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांची आई इंदिरा देवी सहभागी व्हायच्या. त्यांच्या फार घट्ट नाते होते. महेश बाबू हे कृष्णा गारु आणि इंदिरा देवी यांचे चौथे अपत्य आहेत. महेश बाबू यांचे भाऊ रमेश बाबू यांचेही यंदाचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले.