लॉकडाउन काढल्यापासून निर्मात्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे धाव घेतली आहे. आता पुन्हा एकदा चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची मज्जा प्रेक्षकांना लुटता येणार आहे. आता लवकरच ‘मेजर’ हा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत असलेला चित्रपट प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अदिव शेषने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अदिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या टीझरची सुरुवात “वर येऊ नका मी एकटा त्यांना सांभाळेन”, या डायलॉगने होते. हा टीझर शेअर करत त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख सांगितली आहे. यावेळी अदिवने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात आपल्याला बिहाइन्ड द सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट २६/ ११ हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर अंगावर शहारे येणारा आहे. दरम्यान हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

‘मेजर’ या चित्रपटात अदिवी शेषसोबत प्रकाश राज, सई मांजरेकर, रेवती आणि शोभिता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकिरण टिक्का यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती ही महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.