बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आपल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे अनेकदा ती ट्रोलही होताना दिसते. पण आता तिचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती फोटो क्लिक करणाऱ्या चाहत्यावर भडकलेली दिसत आहे. सध्या मलायकाच्या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

मलायका अरोरा अलिकडे रोज योगा सेंटरच्या बाहेर स्पॉट होते. नुकतीच ती आणि अभिनेत्री कुब्रा सैत योगा सेंटरच्या बाहेर एकत्र दिसल्या होत्या. पण यावेळी असं काही घडलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा योगा सेंटरमधून निघून कारमध्ये बसताना दिसत आहे आणि त्याचवेळी तिचा एक चाहता तिच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे. मलायका देखील सुरूवातील त्याला पोझ देते पण सतत ब्लर फोटो असल्याने तो पुन्हा पुन्हा फोटो काढत राहतो. ज्यामुळे मलायका वैतागलेली दिसते. या व्हिडीओमध्ये अखेर त्या चाहत्याला, “आणखी किती फोटो काढणार?” असा प्रश्न विचारताना दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, मलायका चाहत्यावर नाराज झालेली दिसत आहे. पण तो चाहता तिला पुन्हा एका फोटोसाठी विनंती करतो तेव्हा ती त्याला पुन्हा पोझ देताना दिसते. त्यावेळी मागे असलेल्या कुब्रा सैतला देखील हसू आवरणं कठीण झालेलं पाहायला मिळत आहे. मलायकाचा चाहत्यासोबतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ब्लॅक स्पगेटी आणि शॉर्टमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा- “मी जर तुम्हाला चुकीची वाटत असेन तर…” ट्रोलर्सना अँबर हर्डचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मलायकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर ती मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकानं अर्जुनसोबतच नातं कबुल केलं होतं. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं लवकरच लग्न करणार असल्याची हिंट दिली होती. मात्र या विषयावर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अर्जुन किंवा मलायकानं दिलेली नाही. पण या नात्यामुळे त्यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल व्हावं लागलं आहे.