मलायका अरोराने सुपर मॉडेल लुकमध्ये शेअर केला व्हिडीओ; स्टनिंग अंदाज पाहून फॅन्स घायाळ

या व्हिडीओमधला मलायकाचा स्टनिंग आणि ग्लॅमरस लुक पाहून फॅन्स घायाळ झालेत. मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

malaika

अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी टीव्ही शोमधून ती नेहमीच परिक्षकाच्या भूमिकेत झळकलेली दिसून येत असते. मलायका अरोरा आता पुन्हा एकदा एका शोमध्ये परिक्षण करताना दिसून येणार आहे. ‘सुपर मॉडेल ऑफ द ईअर सीजन 2’ असं या टीव्ही शोचं नाव आहे. मलायका अरोराने याचा एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिचा स्टनिंग आणि ग्लॅमरस लुक पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत. मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

अभिनेत्री मलायका अरोरा स्वतः एक मॉडेल आहे आणि ‘सुपर मॉडेल ऑफ द ईअर सीजन 2’ या टीव्ही शो साठी तिने मॉडेलचाच लुक तयार केलाय. मलायकाच्या या व्हिडीओला तिच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणात पसंती दिलीय. ‘सुपर मॉडेल ऑफ द ईअर सीजन 2’ हा टीव्ही येत्या २२ ऑगस्टपासून एमटीवीवर प्रसारित होणारेय. या शोमध्ये मलायकासोबत अभिनेता मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर सुद्धा परिक्षण करताना दिसून येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका अरोराने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या स्पेशल सॉंगमधून वेगळी ओळख निर्माण केली. ‘छैंया छैंया’, ‘अनारकली’ आणि ‘मुन्नी बदनाम’ सारख्या सुपरहीट सॉंगमधून तिने आपली अदाकारी दाखवली. यासोबतच तिचा डान्स व्हिडीओ सुद्धा खूपच फेमस होत असतात. ती नेहमीच आपल्या लुक्स आणि स्टाइलने फॅन्सना आकर्षित करत असते. मलायका ‘इंडिया गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सारख्या शो मध्ये परिक्षक म्हणून झळकली आहे. तिच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर मलायका आणि अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनमुळे बरीच चर्चेत आलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malaika arora looking super model in latest video super model of the year prp

ताज्या बातम्या