फिटनेस, फॅशनमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. सतत कोणत्या ना कारणामुळे ती चर्चेत असते. खरं तर लोकांचं लक्ष आपल्याकडे कसं वेधून घेता येईल हे मलायकाला चांगलंच ठाऊक आहे. यामुळेच सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहते.

जवळपास २५ दिवसांपूर्वी मलायकाच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात ती किरकोळ जखमी झाली होती. अपघातानंतर ती रूग्णालयात भरती देखील झाली. पण यामध्ये तिला झालेली जखम तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मलायकाने एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या डोक्याला झालेली जखम दिसत आहे.

अपघातानंतर मलायकाने कामामधून ब्रेक घेतला होता. आता तिने तिच्या कामाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे. मलायकाच्या डोळ्याजवळ वरच्या बाजूस अपघाताची खूण दिसत आहे. या फोटोमध्ये ती ज्युस पिताना दिसत आहे. तसेच काळ्या रंगाचे सनग्लासेस देखील तिने लावले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – ब्रेकअपच्या चर्चांनंतर सिद्धार्थ मल्होत्राच्या पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाला…

खोपोली एक्सप्रेस-वेवर मलायकाच्या कारला अपघात झाला होता. तीन कार एकत्र एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता. मात्र सुदैवाने यामध्ये कोणी गंभीर जखमी झालं नाही. मलायकाने या अपघाताची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती.