बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा मागच्या बऱ्याच काळपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. पण नेहमीच सोशल मीडियावर तिची चर्चा मात्र होताना दिसते. अरबाज खान आणि मलायकाने १८ वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या अगोदरच मलायकाने अर्जुन कपूरला डेट करायला सुरूवात केली होती. आता यावर मलायका अरोराने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. घटस्फोट, नातेसंबंध आणि मुलगा अरहान या सगळ्यावर मलायकाने प्रतिक्रिया दिली आहे.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं लग्न डिसेंबर १९९८ मध्ये झालं होतं. त्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये दोघंही घटस्फोट घेत वेगळे झाले होते. अरबाज खान जॉर्जिया एड्रियानीला डेट करू लागल्यानंतर मलायका आणि त्याच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान खान आता १९ वर्षांचा आहे. तर सध्या मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहेत.
आणखी वाचा- मलायका अरोरासह ‘या’ दोन दिग्गज महिला होत्या चंकी पांडेवर फिदा; एक म्हणाली, “…तर आज मी तुझी बायको असते”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने घटस्फोटानंतर तिचे अरबाजशी कशाप्रकारचे नातेसंबंध आहेत यावर भाष्य केलं. या मुलाखतीत तिला, “आजही तुझे अरबाजशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मलायका म्हणाली, “आता आमच्यात चांगले संबंध आहेत. आम्ही दोघंही बऱ्यापैकी समजूतदार आहोत. आम्ही खूश आहोत. पूर्वीपेक्षा शांत आहोत. अरबाज एक चांगला व्यक्ती आहे. माझी इच्छा आहे की, त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व सुख मिळो. कधी कधी असं होतं की माणसं चांगली असतात. फक्त ती एकत्र असणं चांगलं नसतं. आता जे जसं आहे तसं आहे. पण तरीही त्याचं भलं व्हावं असंच मला कायम वाटतं.”

आणखी वाचा- Malaika Arora Photos: अगदी शॉर्ट ड्रेस घालून निघाली मलायका अरोरा इतक्यात समोर कुत्रा आला अन..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवळपास १८ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याबद्दल मलायका म्हणाली, “मला वाटतं मी स्वतःला सगळ्यात पुढे ठेवून निर्णय घेतला. आज मी आधीपेक्षा चांगली व्यक्ती आहे. आज माझे माझ्या मुलाशी चांगले संबंध आहेत. तो पूर्वीपेक्षा आता जास्त खूश असतो आणि यात मी आनंदी आहे. एवढंच नाही तर अरबाजशीही माझे खूप चांगले संबंध आहेत. मी स्वतःसाठी निर्णय घेतला आणि एक महिला आहे म्हणून मी कधीच घाबरले नाही. मी फक्त माझ्या मनाचं ऐकलं. सर्वांनी खूश राहणं खूप गरजेचं आहे. पण तुम्ही सर्वांना आनंद ठेवू शकत नाही.”