बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९८ साली लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र मुलगा अरहान खानसाठी ते दोघेही एकत्र येताना दिसतात. नुकतंच मलायका आणि अरबाज हे दोघेही एकत्र मुंबई विमानतळावर दिसले. ते दोघेही त्यांचा मुलगा अरहान खानला सोडण्यासाठी गेले होते. पण त्यावेळी ते दोघेही भांडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अरहान खान हा गेल्यावर्षी अभ्यासासाठी परदेशात गेला होता. काही दिवसांपूर्वी तो हिवाळ्याच्या सुट्टीसाठी मुंबईत परतला होता. अरहानच्या या सुट्ट्या आता संपल्याने तो पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघाला. नुकतंच मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघेही त्याला सोडण्यासाठी विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. यादरम्यान अरबाज आणि मलायका काहीतरी गप्पा मारताना दिसले.
अरहानला विमानतळावर ड्रॉप करण्यासाठी आलेली मलायका खूप भावूक झाल्याचे दिसले. ती शेवटपर्यंत त्याच्याकडे पाहत होती. यावेळी अरहानने आई आणि बाबा दोघांनाही घट्ट मिठी मारली. यादरम्यान मलायका अरहानला काहीतरी समजावताना दिसत आहे. तर तो तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहे.
यावेळी अरबाजने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याचवेळी मलायका ग्रे रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसली. यावेळी विमानतळावर मलायका आणि अरबाजमध्ये काहीतरी संवाद साधताना दिसत आहे. तर दुसरीकडे अरहान हा त्याच्या मित्रासोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ते दोघेही भांडत असल्याचा अंदाज लावला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. यावर एकाने म्हटले की, ‘जर इथे मीडिया नसता तर मारामारी झाली असती’. तर एकाने विचारले की ‘मलायका त्याच्याशी भांडत आहे का?’ तर एकाने ‘अर्जुन कुठे आहे?’ असा प्रश्न विचारला.
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर ते दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. एकीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.