प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांचं कार अपघातात निधन झालं आहे. ते ३९ वर्षांचे होते. त्रिशूरमधील कॅपमंगलम येथे सोमवारी(५ जून) पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन कलाकार जखमी झाले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कोल्लम सुधी यांच्या कारला ट्रकने दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. अन्य तीन कलाकारांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. https://www.instagram.com/p/CtF6_3UL_J-/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== कोल्लम सुधी वातकरा येथील एका कार्यक्रमानंतर घरी परतत होते. त्यांच्याबरोबर कॉमेडियन बीनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे तीन कलाकारही होते. या अपघातात त्यांनाही दुखापत झाली आहे. कोल्लम सुधी मल्याळमधील प्रसिद्ध अभिनेता होते. त्यांनी 'कट्टप्पनयिले ऋत्विक रोशन', 'कुट्टानदन मारप्पा', 'थिएटा रप्पाई', 'वाकाथिरिवु', 'एन इंटरनेशनल लोकल स्टोरी', 'एस्केप', 'केसु ई वेदीन्ते नाधन' आणि 'स्वर्गथाइल कट्टुरुम्बु' यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.